नवी दिल्लीः मोटोरोला आपल्या जी सीरीजच्या हँडसेटवर काम करीत आहे. लवकरच एक नवीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने नुकतेच ३ फोन लाँच केले आहेत. मोटोरोला वन फ्यूजन नंतर लेनोवाची मालकी असलेल्या कंपनीने मोटोने G5 प्लस आणि मोटोरोला वन व्हिजन प्लस लाँच केले आहेत. आता कंपनी या महिन्यात मोटो जी सीरीजचा आणखी एक फोन लाँच करू शकते. या फोनला एका ऑनलाइन स्टोरवर पाहिले गेले आहे.

वाचाः

टिप्स्टर सुधांशू अंभोर यांनी ट्विटरवर मोटो जी९ प्लस च्या किंमतीचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये येणाऱ्या डिव्हाईसची किंमत जवळपास १९ हजार रुपये असल्याची माहिती आहे. ही किंमत ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. लिस्टिंगवरून हेही माहिती होत आहे की, फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाः

स्क्रीनशॉट वरून हँडसेटचे संपूर्ण वैशिष्ट्यांचा खुलासा करण्यात आला नाही. तसेच या स्क्रीनशॉटवरून फोनचा फोटो नाही. आता पर्यंत मोटो जी ९ सीरिज संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही. मोटो जी ८ सीरीज ला मागच्या ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. मोटो जी ९ लाँच संबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here