Baban Bansidhar Lihinar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Oct 2022, 4:54 pm

Diwali dhamaka offer : दिवाळी निमित्त वेगवेगळ्या कंपन्या धमाकेदार ऑफर घेवून आल्या आहेत. तुम्हाला जर विवोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. फोनची किंमत, फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या.

 

vivo X80

हायलाइट्स:

  • दिवाळीत जबरदस्त ऑफर
  • विवोच्या फोनवर डिस्काउंट
  • १०१ रुपये देवून फोन घरी न्या
नवी दिल्लीः फेस्टिव्ह सीजनमध्ये लोक नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा प्लान करीत आहेत. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी विवोने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या Big Joy Diwali Sale मध्ये खूपच कमी किंमतीत फोन खरेदी करण्याची संधी देत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही विवो स्मार्टफोन घरी घेवून जावू शकता. सेलमधये कंपनी यूजर्सला आकर्षक कॅशबॅक सुद्धा देत आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त १०१ रुपयात फोन खरेदी करू शकता, कसं ते जाणून घ्या.

८ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक
विवो आपल्या X80 आणि V25 सीरीजवर बंपर डिस्काउंट देत आहे. ग्राहकांसाठी हा डिस्काउंट ICICI Bank आणि SBIच्या ब्रँड ईएमआय (Brand Emi) वरून पेमेंट केल्यावर मिळेल. या ऑफर मध्ये तुम्हाला X80 सीरीजचा स्मार्टफोन खरेदी वर ८ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि V25 सीरीजचा स्मार्टफोन खरेदी केल्यावर ४ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो. यासोबत तुम्हाला १०१ रुपयाच्या इनिशियल पेमेंट केल्यानंतर X आणि V सीरीजचे स्मार्टफोन खरेदी करू शकता येईल. दुसरीकडे जर तुम्ही १५ हजार रुपयांपेक्षा जास्त अडवॉन्सड मध्ये फुल पेमेंट केल्यानंतर या सीरीजच्या स्मार्टफोनला खरेदी करीत असाल तर ६ महिन्याची अतिरिक्त वॉरंटी दिली जाते.

वाचाः १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा डॉल्बी साउंडचे शानदार Smart LED TV

Jio Digital Life सोबत करू शकता १० हजारांची बचत

विवो आपल्या वाय सीरीजच्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर आणि डिस्काउंट देत आहे. जर तुम्ही १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा वाय सीरीजचा स्मार्टफोन खरेदी करीत असाल तर तुम्ही फक्त १०१ रुपयाचे इनिशियल पेमेंट करू शकता. तुम्हाला ICICI Bank, SBI आणि दुसऱ्या बँकेच्या ब्रँड ईएमआय (Brand Emi) वरून पेमेंट केल्यानंतर २ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो. दुसरीकडे विवोच्या वाय सीरीजच्या स्मार्टफोनवर Jio Digital Life सोबत १० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळतील. एक्स आणि वाय सीरीजच्या स्मार्टफोन प्रमाणे या ठिकाणी ६ महिन्याची अतिरिक्त वॉरंटी दिली जाते.

वाचाः आता पुण्यासह ‘या’ शहरांतील युजर्सना मिळणार तुफान स्पीडसह 5G नेटवर्क

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here