OPPO Smartphone Price Cut : चीनची आघाडीची स्मार्टफोन मेकर कंपनी OPPO ने भारतात आपल्या पॉपल्यूर स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. यंदाच्या दिवाळी आधी तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. OPPO ने यावर्षीच्या सुरुवातीला भारतात अनेक मिड रेंज स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात काही सर्वात लोकप्रिय OPPO F21 Pro, Oppo A55 आणि Oppo A77 यासारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. ओप्पो कंपनीने ऐन दिवाळी आधी गुपचूपपणे कोणताही गाजावाजा नक करता आता घोषणा केली आहे की, या मॉडलच्या किंमतीत कपात केली जात आहे. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. जाणून घ्या फोनची किंमत.

​OPPO F21 Pro, OPPO A55 & OPPO A77 new prices in India

oppo-f21-pro-oppo-a55-oppo-a77-new-prices-in-india

१ हजार रुपयाच्या कपातीनंतर ओप्पो F21 प्रो च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मॉडलसाठी २२ हजार ९९९ रुपये किंमत होती ती आता २१ हजार ९९९ रुपये झाली आहे. OPPO A55 चे ६ जीबी रॅम व्हेरियंट सध्या १४ हजार ९९९ रुपये किंमतीत विकला जात आहे. OPPO A55 च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजला आता १४ हजार ४९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. OPPO A77 चे ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची सुरुवातीची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.

वाचा: रिचार्ज करा आणि वर्षभर टेन्शन फ्री राहा, Airtel-Jio-Vi-BSNL च्या प्लान्समध्ये लॉंग व्हॅलिडिटीसह ‘हे’ बेनिफिट्स

OPPO F21 Pro

oppo-f21-pro

OPPO F21 Pro मध्ये 6.43-इंच FHD+ AMOLED स्क्रीनचे रिफ्रेश रेट 90Hz दिले आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 680 सीपीयू, 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबीचे एक्सपेंडेबल स्टोरेज क्षमता दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल बॅक कॅमेरा कॉन्फ़िगरेशन मध्ये 64-मेगापिक्सलचा वाइड-एंगल प्राइमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी शूटर आणि 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम लेन्सचा समावेश आहे. OPPO F21 Pro मध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्जिंला सपोर्ट करते.

वाचाः १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा डॉल्बी साउंडचे शानदार Smart LED TV

​OPPO A55 चे स्पेसिफिकेशन्स

oppo-a55-

OPPO A55 मध्ये 6.55-इंच IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचा रिजॉल्यूशन 720 x 1,600 आहे. रिफ्रेश रेट 60Hz दिले आहे. स्मार्टफोन MediaTek Helio G35 CPU, 4GB RAM आणि 64GB एक्सपेंडेबल स्टोरेज दिले आहे. Oppo A55 मध्ये डुअल बॅक कॅमेरा कॉन्फिगरेशन दिले आहे. ज्यात 50-मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेंसर दिले आहे. OPPO A55 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सोबत येते.

वाचाः गुड न्यूज! फक्त ९,१६५ रुपये खर्च करून घरी न्या iPhone 12 Mini, पाहा कधीपर्यंत ऑफर?

​OPPO A77 चे स्पेसिफिकेशन्स

oppo-a77-

OPPO A77 मध्ये 6.56-इंच IPS LCD डिस्प्ले दिले आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सोबत याला 1TB पर्यंत वाढवले जावू शकते. स्मार्टफोन MediaTek Helio G35 CPU द्वारा संचालित आहे. OPPO A77 मध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहे. एक 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर सोबत आणि दूसरा 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर सोबत डिवाइस मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ज्याला 33W फास्ट चार्जिंग सोबत जोडले आहे.

वाचाः 5G Frauds: घाई-घाईत 5G मिळविण्याच्या नादात ‘या’ चुका करू नका, अन्यथा अकाउंट होणार रिकामे

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here