देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या ऑफर मध्ये ग्राहकांना डबल बेनिफिट मिळणार आहे. जिओ कंपनीने केलेल्या ऑफर मध्ये JioFiber Double Festival Bonanza Offer 2022 अंतर्गत कंपनी १०० टक्के व्हॅल्यू बॅक आणि १५ दिवसाची अतिरिक्त वैधता ऑफर केली जात आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांना नवीन JioFiber Plans बुक केल्यानंतर ६५०० रुपयापर्यंत फायदे दिले जात आहे. दिवाळी निमित्त कंपनी नेहमीच वेगवेगळी ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणत आहे. यंदाच्या दिवाळी निमित्त कंपनीने ही हटके ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरचा लाभ कसा मिळू शकतो, त्यात काय बेनिफिट आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

JioFiber Double Festival Bonanza Offer 2022

jiofiber-double-festival-bonanza-offer-2022

नावाप्रमाणेच ही ऑफर आहे. डबल फेस्टिव्ह बोनान्जा मध्ये ग्राहक जर नवीन जिओ फायबर कनेक्शनला बुक करीत असाल तसेच ५९९ रुपये किंवा ८९९ रुपयाचे प्लान घेत असतील तर या प्लानमध्ये मिळणाऱ्या फायद्यात २ अतिरिक्त फायदे मिळते. यातील एक म्हणजेच १०० टक्के व्हॅल्यू बॅक आणि १५ दिवसाची अतरिक्त वैधता आहे.

वाचाः ऐन दिवाळीच्या तोंडावर Omicron BF.7 Covid ची भीती वाढली, या App ने मिळेल मदत

​५९९ रुपयाचा जिओ फायबर प्लान

रिलायन्स जिओचा ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये 30Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. प्लानमध्ये १४ हून जास्त ओटीटी अॅप्स आणि ५५० हून जास्त ऑन डिमांड चॅनल ऑफर केले जाते. जर ग्राहक ६ महिन्यासाठी (Rs. 3,594 + Rs. 647 GST) एकूण ४२४१ रुपये देत असेल तर नवीन ग्राहकांना कंपनी ४५०० रुपये किंमतीचे व्हाउचर्स देईल. जिओ ग्राहकांना १ हजार रुपये अजिओ १ हजार रुपये रिलायन्स डिजिटल, १ हजार रुपये नेटमेड्स आणि १५०० रुपये IXIGO व्हाउचर म्हणून देत आहे. याशिवाय, या प्लानमध्ये ६ महिन्याचे अतिरिक्त १५ दिवसासाठी अतिरिक्त वैधता मिळेल.

वाचाः Jio ने खेळली मोठी खेळी, हाय स्पीड 5G साठी Nokia सोबत डील, Airtel ला जोरदार झटका

​८९९ रुपयाचा जिओ फायबर प्लान (६महिन्यासाठी)

८९९ रुपयाच्या जिओ फायबर प्लानमध्ये 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळतो. या प्लानमध्ये १४ हून जास्त ओटीटी अॅप्स मिळते. ५५० हून जास्त ऑन डिमांड चॅनल मिळते. ग्राहकांना प्लानसाठी (Rs. 5,394 + Rs. 971 GST) एकूण ६३६५ द्यावे लागतील. परंतु, ग्राहकांना कंपनी फेस्टिव सीजन अंतर्गत ६५०० रुपयाचे व्हाउचर म्हणून देत आहे. २ हजार रुपये Ajio,१ हजार रुपये Reliance Digital, ५०० रुपये NetMeds आणि ३ हजार रुपये IXIGO चे व्हाउचर म्हणून मिळतील. याशिवाय, या प्लानमध्ये १५ दिवसाची अतिरिक्त वैधता मिळेल.

वाचाः दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी बेस्ट स्मार्टफोन्स, Amazon Sale मध्ये मिळतोय जोरदार डिस्काउंट, पाहा लिस्ट

८९९ रुपयाचे जिओ फायबर प्लान (३महिन्यासाठी)

नवीन जिओ ग्राहक ३ महिन्यासाठी ८९९ रुपयाचा प्लान घेत असेल तर एकूण २६९७ रुपये (Rs. 3,182 + Rs. 485 GST) द्यावे लागतील. कंपनी या प्लानमध्ये ३५०० रुपयांपर्यंत व्हाउचर देत आहे. १ हजार रुपये AJio, ५०० रुपये रिलायन्स डिजिटल आणि १५०० रुपये IXIGO चे व्हाउचर म्हणून देत आहे. या प्लानमध्ये कोणतीही अतिरिक्त वैधता ऑफर केली जात नाही.

वाचाः IIT मद्रासमधील विद्यार्थ्यांनी बनवले नवीन सॉफ्टवेयर, या सेक्टरला होणार मोठा फायदा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here