Smartphone Under 10000: फ्लिपकार्टवर बिग दिवाळी सेल सुरू झाला असून हा सेल २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि होम अप्लायन्सेससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवरून तुम्ही बंपर डिस्काउंट आणि सर्वोत्तम ऑफरवर स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याच वेळी, जर तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मजबूत फीचर असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय आहेत. एवढेच नाही तर, बिग दिवाळी सेल अंतर्गत, कंपनी SBI बँक कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के झटपट सूट देत आहे.आज आम्ही तुम्हाला अशा फोनबद्दल सांगणार आहो, जे तुम्ही फ्लिपकार्टमधून १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता आणि मोठी बचत करू शकता. या लिस्टवर एक नजर टाकुया.

Redmi 10

redmi-10

Redmi 10: Redmi 10 ची किंमत १४,९९९ रुपये आहे.पण, सेलमध्ये उपलब्ध ऑफरसह, तुम्ही हा फोन ७९९९ रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. त्याच वेळी, एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर ८४०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Redmi 10 मध्ये ६.७ -इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. Redmi 10 हँडसेट Android 11 सह येतो. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल रिअर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.

वाचा : WhatsApp वर मिळवा PAN Card आणि DL चे डिटेल्स, फॉलो करा या स्टेप्स

Redmi A1 plus

redmi-a1-plus

Redmi A1 Plus: Redmi ने अलीकडेच आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A1+ भारतात सादर केला आहे. हा स्मार्टफोन ६.५२ -इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो. यामध्ये तुम्हाला प्री-इंस्टॉल एफएम रेडिओ आणि ड्युअल सिम कार्ड सपोर्ट देखील मिळेल. यासोबतच Redmi A1 Plus मध्ये Mediatek Helio A22 प्रोसेसर आणि 3GB LPDDR4X रॅमसह 32 GB स्टोरेज सपोर्ट देखील उपलब्ध आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा ८ MP आहे आणि दुसरा AI कॅमेरा उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर फोनची सुरुवातीची किंमत ६९९९ रुपये आहे.

वाचा : One Plus चा ‘हा’ पॉप्युलर 5G फोन १८ हजारांपेक्षा कमीमध्ये होईल तुमचा, फोनचे फीचर्स लय भारी

​Samsung Galaxy F13

samsung-galaxy-f13

Samsung Galaxy F13 : Samsung Galaxy F13 फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये, तुम्ही सर्व ऑफर्ससह Samsung Galaxy F13 ८४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, फोनवर एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. डिव्हाइस ६.६ -इंच फुल एचडी + डिस्प्लेसह सुसज्ज आहे. फोनमध्ये ६००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे.तसेच, फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F13 मध्ये ५० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

वाचा : Realme च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, ऑफर पाहताच लगेच कराल खरेदी

Infinix Smart 6

infinix-smart-6

Infinix Smart 6: Infinix चा स्मार्ट 6 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये तुमची पसंती बनू शकतो. या फोनमध्ये ६.६ -इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप सनलाइट डिस्प्ले आहे ज्याची ब्राइटनेस 500 निट्स आहे आणि ती या किमतीतही सर्वात जास्त आहे. परफॉर्मन्ससाठी यात Helio A22 Quad Core प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा फोन Android 11 (Go Edition) वर काम करतो.स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. हे 2 GB व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करते. या फोनमध्ये DTS सराउंड साउंड स्पीकर आहेत. फ्लिपकार्टवर सध्या हा फोन ६४९९ रुपयांत उपलब्ध आहे.

Poco C31

poco-c31

Poco C3 1: या Poco फोनची किंमत १०,९९९ रुपये आहे. Flipkart सेलमध्ये, तुम्ही हा फोन ७४९९ रुपयांच्या किंमतीसह खरेदी करू शकता. याशिवाय, फ्लिपकार्ट यावर एक्सचेंज ऑफरही देत आहे. एक्सचेंज अंतर्गत, तुम्हाला फोनवर ६९५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये तुम्हाला ६.५३ इंच HD+ डिस्प्ले आणि ५००० mAh बॅटरी मिळेल. त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी Poco C31 फोनमध्ये १३-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे, तर सेल्फीसाठी ५-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वाचा : One Plus चा ‘हा’ पॉप्युलर 5G फोन १८ हजारांपेक्षा कमीमध्ये होईल तुमचा, फोनचे फीचर्स लय भारी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here