Tata Sky Broadband वेगाने आपले युजर बेस वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीने सध्या देशातील १८ शहरात आपली सर्विस सुरू केली आहे. देशाच्या अनेक भागात करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहे. अनेक जण घराबाहेर पडत नसल्याने त्यांना इंटरनेट डेटा सुद्धा नेहमीपेक्षा जास्त लागतो. त्यामुळे अशा युजर्संसाठी टाटा स्कायचे ब्रॉडबँड प्लान चांगले ठरू शकतात. कंपनीकडे सध्या ऑफर करण्यासाठी दोन कॅटेगरीतील प्लान उपलब्ध आहेत. पहिल्या प्लानमध्ये युजर्संना एक महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो तर दुसऱ्या कॅटेगरीच्या प्लानमध्ये लिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. या दोन्ही कॅटेगरीत कंपनी १ ते १२ महिन्यांपर्यंत वैधता असलेले प्लान ऑफर करीत आहे. जाणून घ्या कोणत्या कॅटेगरीत कोणत्या प्लानमध्ये युजर्संना काय-काय बेनिफिट्स दिले जात आहे…

टाटा स्कायचा पहिला फिक्स्ड जीबी ब्रॉडबँड प्लान ७९० रुपयांचा आहे. या प्लानमध्ये 50Mbps च्या स्पीडने १५० जीबी डेटा दिला जातो. कंपनीच्या पोर्टफोलियो मध्ये दुसरा प्लान ९५० रुपयांचा आहे. या प्लानमध्ये 100Mbps च्या स्पीडने एकूण ५० जीबी डेटा मिळतो. तिसरा प्लान हा १ हजार रुपयांचा येतो. या प्लानमध्ये 50Mbps च्या स्पीडने आणि ५०० जीबी डेटा मिळणार आहे. एका महिन्याच्या वैधतेसह १०५० रुपयांचा प्लान अंतर्गत तुम्हाला या प्लानमध्ये 100Mbps च्या स्पीडने ५०० जीबीपर्यंत डेटा मिळतो.

कंपनी तीन महिन्यांच्या वैधतेसह चार प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये २२५० रुपये, २७०० रुपये, २८५० रुपये आणि ३००० रुपये यांचा समावेश आहे. २२५० रुपयांच्या प्लानमध्ये 50Mbps च्या स्पीडने १५० जीबी डेटा दिला जातो. जर तुम्हाला २७०० रुपयांचा प्लानला सब्सक्राईबर्स करीत असाल तर तुम्हाला 100Mbps च्या स्पीडने २५० जीबी डेटा मिळतो. २८५० रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 50Mbps ची स्पीड मिळू शकते. तीन महिन्यांची वैधता असलेला ३ हजार रुपयांचा प्लान सर्वात महाग प्लान आहे. यात तुम्हाला 100Mbps च्या स्पीडने ५०० जीबी पर्यंत डेटा दिला जात आहे.

६ महिन्यांच्या प्लानमध्ये चार पर्याय मिळतील. पहिला प्लान ४०५० रुपयांचा आहे. यात 50Mbps च्या स्पीडने १५० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. टाटा स्काय ब्रॉडबँडच्या ४८६० रुपयांच्या प्लानमध्ये 100Mbps च्या स्पीडने २५० जीबी डेटा मिळेल. तिसरा प्लान ५१३० रुपयांच्या सब्सक्रिप्शनसोबत येतो. यात 50Mbps च्या स्पीडने आणि ५०० जीबी डेटा मिळतो. ६ महिन्यांच्या वैधतेसह सर्वात महाग प्लान हा ५४०० रुपयांचा आहे. या प्लानमध्ये 100Mbps च्या स्पीडने ५०० जीबी डेटा मिळतो. हे सर्व प्लान १० टक्के सूटसोबत येतात.

लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे अनेक युजर्संएक वर्षांपर्यंत वैधता असलेले प्लान सब्सक्रायबर्स करीत आहेत. टाटा स्कायकडे काही जबरदस्त ब्रॉडबँड वार्षिक प्लान आहेत.यात ७६५० रुपये, ९१८० रुपये, ९६९० रुपये, आणि १०२०० रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. ७६५० रुपयांच्या प्लानमध्ये 50Mbps च्या स्पीडने १५० जीबी डेटा दिला जातो. ९१८० रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 100Mbps च्या स्पीडने २५० जीबी डेटा दिला जातो. १२ महिन्यांच्या वैधतेसह तिसरा प्लानमध्ये ९६९० रुपयांचा आहे. यात 50Mbps च्या स्पीडने इंटरनेट ब्राउझिंग साठी एकूण ५०० जीबी डेटा मिळतो. सेगमेंटमध्ये सर्वात महाग प्लान हा १०२०० रुपयांचा आहे. यात 100Mbps च्या स्पीडने ५०० जीबी डेटा मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here