वाचाः
जिओ आणि गुगलची पार्टनरशीप
गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी सांगितले की, भारतासारख्या देशात सर्वांकडे इंटरनेट असणे गरजेचे आहे. जिओ आणि गुगल च्या पार्टनरशीपमुळे लाखो भारतीयांना इंटरनेट मिळू शकेल ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे.
अँड्रॉयड बेस्ड स्मार्टफोनसाठी ऑपरेटिंग सिस्टम बनवणार जिओ-गुगल
मुकेश अंबानी यांनी या बैठकीत सांगितले की, गुगल जिओ प्लॅटफॉर्मवर ७.७ टक्के भागीदारीसाठी ३३७३७ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. यासोबतच आता गुंतवणुकीचा आकडा १.५२ लाख कोटीवर पोहोचला आहे. आता पर्यंत १४ कंपन्यांनी जिओत गुंतवणूक केली आहे. जिओ आणि गुगल मिळून अँड्रॉयड बेस्ड स्मार्टफोन साठी सिस्टम बनवणार आहे.
वाचाः
२जी मुक्त भारत हे जिओचे ध्येय
या मीटिंगमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले की, भारताला २जी मुक्त करणे हे जिओचे ध्येय आहे. यासाठी कंपनी २ जी ग्राहकांपर्यंत ४जी इंटरनेट पोहोचवेल. अंबानी यांनी सांगितले की, आमचे ध्येय आहे की, सर्व भारतीयांच्या हातात स्मार्टफोन देणे आहे. भारतात जवळपास ३५ कोटी २ जी फीचर फोन युजर्स आहेत. गुगल आणि जिओ मिळून या लोकांना स्वस्त स्मार्टफोन बनवणार आहे. जिओचे ध्येय आहे की, ३० कोटी लोकांना २ जी वरून ४ जी मध्ये अपग्रेड करणे होय.
वाचाः
जिओ फोन जगातील सर्वात स्वस्त ४ जी हँडसेट
मीटिंगमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ फोन सध्या जगातील सर्वात स्वस्त ४ जी कनेक्टिविटीचा फोन आहे. २०१७ मध्ये लाँच करण्यात आलेला जिओ फोनची किंमत ६९९ रुपये आहे. तर २०१८ मध्ये आलेल्या जिओ फोन २ ची किंमत २९९९ रुपये आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times