Best Tech Gift For Bhaidooj : देशात दिवाळीला उत्साहात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रोषणाई पाहायला मिळत आहे. अशात बहिणी ज्याची आतुरतेने वाट पाहता असतात तो सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी दिवशी भाऊ-बहीण एकमेकांना गिफ्ट देतात. काही जण दागिने, नवीन कपडेलत्ते घेतात. तर, काही जण स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीसारखे मोठे गिफ्ट खरेदी करतात. पण, जर तुमचे बजेट खूप जास्त नसेल आणि कमी बजेटमध्ये काय गिफ्ट द्यायचे याचाही विचार तुम्ही करत असाल आणि याबाबत गोंधळात असाल तर, आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण, आज आज आम्ही तुम्हाला अशा काही स्वस्तात मस्त गॅजेट्सबद्दल सांगणार आहो, जे गिफ्टिंगसाठी उपयुक्त आहेत आणि तुमच्या खिशाला देखील कात्री लावणार नाही . यामध्ये ,Lava Probuds N11, क्रोमा ट्रुली वायरलेस इअरबड्स,boAt स्टोन ब्लूटूथ स्पीकर सारख्या डिव्हासेसचा समावेश आहे.

boAt Stone Bluetooth Speaker

boat-stone-bluetooth-speaker

boAt स्टोन ब्लूटूथ स्पीकर: boAt स्टोन ब्लूटूथ स्पीक देखील कमी बजेटमध्ये गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. या ब्लूटूथ स्पीकरबद्दल बोलायचे झाल्यास, boAt स्टोन १९० 5W ब्लूटूथ स्पीकर कमी किमतीत भन्नाट फीचर्स ऑफर करते. यात ४ तासांची बॅटरी आणि १.५ तास चार्जिंग वेळ आहे. हा स्पीकर पाणी प्रतिरोधक आहे, ज्यासाठी त्याला IPX7 रेट देखील केले गेले आहे. हा ५ W स्पीकर आहे. स्पीकर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ९९९ रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

वाचा : युजर्ससाठी का महत्त्वाचे आहे WhatsApp ? भारतात किती लोक करतात प्लॅटफॉर्मचा वापर ?

Power Bank

power-bank

Syska 10000 mAh Power bank : आजकाल पॉवर बँक ही एकच गरज आहे. तुम्ही सणानिमित्त हे गॅजेट देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. यात Syska 10000 mAh पॉवर बँक ही कमी किमतीत उपलब्ध असलेली सर्वोत्तम पॉवर बँक आहे. त्याची किंमत ७९९ रुपये आहे. Syska 10000 mAh पॉवर बँक १०,००० mAh क्षमतेचे पॉवर बँक आहे. यात २ पोर्ट संलग्न आहेत. हे स्मार्टफोनसह टॅबलेट देखील चार्ज करू शकते. प्रवासादरम्यान आजकाल पॉवर बँक हे अतिशय महत्वाचे गॅजेट झाले आहे.

TAGG Verve NEO

tagg-verve-neo

TAGG Verve NEO स्मार्टवॉच: प्रत्येकाला आजकाल स्मार्टवॉच हवे असते. तुम्हीही तुमच्या भावंडांना चांगले गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर, TAGG Verve NEO स्मार्टवॉच चांगला पर्याय आहे. TAGG Verve NEO स्मार्टवॉचची किंमत १४९९ रुपये आहे. याला १० दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. स्मार्टवॉचमध्ये १.६९-इंचाचा HD डिस्प्ले आहे. ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट मॉनिटर अशी वैशिष्ट्ये या घड्याळात उपलब्ध आहेत. हे घड्याळ वॉटर प्रूफ आहे ज्यासाठी त्याला IP68 रेट देखील केले गेले आहे. हे Amazon वर १४९९ मध्ये उपलब्ध आहे.

वाचा : Samsung च्या 5G स्मार्टफोनवर अजूनही मिळतोय ऑफ, १३ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी

Croma Truly Wireless Earbuds

croma-truly-wireless-earbuds

Croma Truly Wireless Earbuds : टाटा कंपनीच्या क्रोमा ब्रँडचे हे इयरबड्स क्रोमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून ७४९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, क्रोमा ट्रुली वायरलेस इअरबड्स आणि केसच्या संयोजनाने ते १५ तासांपर्यंत प्लेटाइम देऊ शकतात. याशिवाय, एका चार्जवर Croma Truly Wireless Earbuds ३ तास टिकू शकते.१००० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुम्हाला गिफ्ट खरेदी करायचे असल्यास तुम्ही क्रोमा ट्रुली वायरलेस इअरबड्सचा नक्कीच विचार करू शकता. Croma Truly Wireless Earbuds खरेदी केल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते.

Lava Probuds N11

lava-probuds-n11

Lava Probuds N11- भारतीय कंपनी लावाचा हा नेकबँड फायरफ्लाय ग्रीन, काई ऑरेंज आणि पँथर ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये येतो. याशिवाय कंपनीने ड्युअल हॉल स्विच फंक्शन डॅश स्विच, टर्बो लेटन्सी, प्रो गेम मोड, नॉइज कॅन्सलेशन सारखे फीचर्स देखील दिले आहेत. यात २८० mAh बॅटरी आहे, जी ४२ तासांपर्यंत प्लेटाईम देते. याशिवाय, Lava Probuds N11 डिव्हाइस १० मिनिट चार्ज केल्यानंतर १३ तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देते. या नेकबँडमध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वरून १४९९ रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

वाचा : Samsung च्या 5G स्मार्टफोनवर अजूनही मिळतोय ऑफ, १३ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here