नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीज () ने आपल्या ४३ व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये मिक्स्ड रियलिटी स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. याला जिओ ग्लास () नावाने लाँच केले आहे. जिओ ग्लासमध्ये व्हर्च्युअल असिस्टेंट देण्यात आले आहे. केबलच्या मदतीने याला मोबाइलला कनेक्ट करता येवू शकते. याचे वजन ७५ ग्रॅम आहे. कंपनीचे म्हणमए आहे की, हा स्मार्टग्लास बेस्ट इन क्लास मिक्स्ड रियलिटी अनुभव देईल.

वाचाः

हाय रिझॉल्यूशन डिस्प्ले मिळणार
जिओने आपल्या स्मार्टग्लासच्या ग्राफिक्सवर खूप काम केले आहे. युजरला हायएस्ट क्लास व्हिज्युअल्स अनुभव मिळणार आहे. या बैठकीत एक डेमो सुद्धा दाखवण्यात आला आहे. जिओ ग्लास द्वारे तुम्ही एकाचवेळी दोन लोकांना व्हिडिओ कॉल करू शकता.

3D होलोग्राफिक व्हिडियो कॉल सपोर्ट
जिओचा हा स्मार्ट ग्लास ३डी होलोग्राफिक व्हिडिओ कॉल सपोर्ट सोबत येईल. म्हणजेच व्हिडिओ कॉलवेळी तुम्हाला ३डी सारखे दिसेल. जिओ ग्लास २५ अॅप्लिकेशन्स सपोर्ट करते.

वाचाः

जिओ मीट चे ५० लाखांहून जास्त डाउनलोड
एजीएममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले की, लाँचिंग नंतर खूप कमी कालावधीत जिओमीट व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅपला ५० लाख अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. जिओ मीट अॅप एक क्लाउड आधारित व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याला अॅप आणि डेस्कटॉप दोन्ही वरून वापर केला जावू शकतो.

वाचाः

जिओमध्ये गुगलची मोठी गुंतवणूक
मुकेश अंबानी यांनी या बैठकीत सांगतले की, जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ७.७ टक्के भागीदारीसाठी ३३७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुगलच्या गुंतवणुकीसोबतच रिलायन्स जिओची गुंतवणुकीचा आकडा आता १.५२ लाख कोटी वर पोहोचले आहे. जिओमध्ये आतापर्यंत १४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. जिओ आणि गुगल एकत्रितपणे अँड्रॉयड बेस्ड स्मार्टफोनसाठी ऑपरेटिंग सिस्टम बनवणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here