वाचाः
द कोरिया कम्यूनिकेशन्स कमिशन (केसीसी) ने चायनीज कंपनीवर १८६ मिलियन वॉन (१.१ कोटी रुपये) चा दंड ठोठावला आहे. केसीसी कोरियात टेलिकम्यूनिकेशन्स आणि डेटा संबंधित रेग्युलेटरचे काम करते. त्यासाठी युजर्सच्या डेटासंबंधी लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुद्धा यांच्यावर आहे. टिकटॉक वर मोठा दंड ठोठावला आहे. कारण, कंपनीने युजर्सचा खासगी डेटा प्रोटेक्ट केला नाही.
वाचाः
रक्कम द्यावी लागणार
कमी वयातील युजर्सच्या डेटाची टिकटॉकडून चूक समोर आली आहे. टिकटॉकवर लावलेला दंड कंपनीच्या या देशातील वार्षिक सेल्ममधील ३ टक्के आहे. लोकल प्रायव्हसी लॉ अंतर्गत इतकी रक्कम कंपनीला चुकवावी लागणार आहे. केसीसीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये याचा तपास सुरू केला होता. त्यात त्यांना टिकटॉक १४ वर्षाखालील मुलांचा डेटा कलेक्ट करुन पालकांच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करीत असल्याचे समोर आले होते.
वाचाः
दुसऱ्या देशात पाठवला डेटा
केसीसीच्या माहितीनुसार, ३१ मे २०१७ पासून ते ६ डिसेंबर २०१९ या दरम्यान चाईल्ड डेटा कमीत कमी ६,०००७ पीस कलेक्ट करण्यात आले होते. तसेच टिकटॉक ने युजर्सला हेही सांगितले नाही की, त्यांचा डेटा दुसऱ्या देशात पाठवत आहे. तपास केल्यानंतर चार क्लाउड सर्विसेज अलीबाबा क्लाउड, फास्टली, एजकास्ट आणि फायरबेसचा वापर करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा टिकटॉकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने टिकटॉकच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times