नवी दिल्लीः विवोचा सब ब्रँड ने नुकताच कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने आणखी एक स्मार्टफोन आणला आहे. हा एक ४जी स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत चीनमध्ये ११९८ युआन (जवळपास १२ हजार ८०० रुपये) आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये पंच होल डिस्प्ले, जबरदस्त प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा यासारखे फीचर यात देण्यात आले आहेत. या फोनची टक्कर शाओमी आणि रियलमी सोबत होईल. चीनमध्ये या फोनची विक्री २३ जुलैपासून सुरू होणार आहे.

वाचाः

iQOO U1 चे खास वैशिष्ट्ये
१९० ग्रॅम वजनाच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक IPS LCD डिस्प्ले आहे. जो फुल HD+ रेजॉलूशन (1080 x 2340 पिक्सल) सोबत येतो. डिस्प्लेत पंचहोल देण्यात आला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. हाच प्रोसेसर रेडमी नोट 9 प्रो, पोको M2 Pro, आणि रियलमी 6 Pro या सारख्या स्मार्टफोनमध्ये देण्यात येतो.

वाचाः

फोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB येतो. अखेरच्या दोन मॉडलची किंमत १३९८ युआन म्हणजेच १५ हजार रुपये आणि १५९८ युआन म्हणजेच १७ हजार २०० रुपये आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. यात साईड पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here