नवी दिल्लीः कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये विविध अपडेटेड टेक्नोलॉजी येत आहे. आता एकदम डोळ्यासारखा फिरणारा कॅमेरा विवोच्या मोबाइलमध्ये आला आहे. स्मार्टफोन कंपनी विवोने भारतात फ्लॅगशीप सीरीज लाँच केली आहे. कंपनीने एका ऑनलाइन कार्यक्रमात ही सीरीज लाँच केली आहे. Vivo X50 आणि स्मार्टफोन्स भारतात प्रीमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या सीरीजच्या Vivo X50 Pro मध्ये कंपनीने पहिल्यांदा असा कॅमेरा आणला आहे. ज्यात गिंबल स्टाईलचे स्टेबलायझेशन देण्यात आले आहे. म्हणजेच या फोनचा कॅमेरा डोळ्याच्या बुबुळासारखा फिरताना दिसेल आणि स्टेबल फोटो क्लिक करेल. या सिस्टमचा पहिल्यांदा मार्केटमध्ये असा कॅमेरा उतरवण्यात आला आहे.

वाचाः

Vivo X50 सीरीजची किंमत
८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या Vivo X50 फोनची किंमत ३४ हजार ९९० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३७ हजार ९९० रुपये आहे. Vivo X50 Proच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंटची किंमत ४९ हजार ७०० रुपये आहे. Vivo X50 दोन रंगात म्हणजेच ब्लू आणि ब्लॅक रंगात खरेदी करता येवू शकतो. Vivo X50 Pro चे ग्रे कलर व्हेरियंट आले आहे. याची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. २३ जुलैपर्यंत ही बुकिंग सुरू राहणार आहे.

वाचाः

या फोनचा पहिला सेल २४ जुलै रोजी होईल. त्यानंतर या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकते. या कार्यक्रमात या फोनसोबत Vivo TWS Neo वायरलेस बड्स सुद्धा लाँच करण्यात आले आहेत. यात २२ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक मिळेल. तसेच याचे वजन केवळ ४.७ ग्रॅम आहे. याची किंमत भारतीय मार्केटमध्ये ५ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

Vivo X50 सीरीजचे वैशिष्ट्ये
नवीन X50 आणि X50 Pro मध्ये ६.५६ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 2376×1080 पिक्सल आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. विवो X50 स्मार्टफोनचे वजन केवळ १७१.५ ग्रॅम आहे. दोन्ही फोनमध्ये 765G प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम पर्यंत लाँच करण्यात आले आहे. दोन्ही फोनची बॅटरी क्षमता वेगवेगळी आहे. Vivo X50 स्मार्टफोन मध्ये 4,200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जो नाइट व्यू, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडियो, डायनमिक फोटो, स्लो मोशन, शॉर्ट विडियो आणि AR क्यूट शूट सपोर्ट दिला आहे.

वाचाः

कॅमेरा सेटअप
Vivo X50 आणि X50 Pro दोन्ही रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. Vivo X50 मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर शिवाय १३ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. तर Vivo X50 Pro मध्ये ४८ मेगापिक्सलचा सोनी IMX598 मेन कॅमेरा सेन्सर दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. Vivo X50 Pro कॅमेऱ्याचे जबरदस्त फीचर म्हणजे गिंबल कॅमेरा सिस्टम आहे. कॅमेऱ्यात नाईट फोटोग्राफी सिस्टम आणि अस्ट्रो मोड देण्यात आला आहे. तसेच याच्या मदतीने स्टेबल व्हिडिओ रेकॉर्ड करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here