वाचाः
Moto G8 Power Lite च्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता हा फोन ९ हजार ४९९ रुपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनला देशात ८ हजार ९९९ रुपयांना लाँच करण्यात आले होते. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनला नवीन किंमतीसोबत फ्लिपकार्टवर आधीच लिस्ट करण्यात आले आहे. मोटो जी ८ पॉवर लाईटमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला आहे. यात मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोन अँड्रॉयड ९ पाय वर चालतो.
वाचाः
स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत १६ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये ग्रेडियंट प्लास्टिक बॅक आहे. रियरमध्ये फ्रिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. मोटोचा हा स्मार्टफोन ड्युल सिम आणि एक मायक्रोएसडी स्लॉट सोबत येतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. या बॅटरीला १० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times