Best Smartphone Offers : महागडे स्मार्टफोन्स फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त असतात असे अनेक युजर्सना वाटत असते. म्हणूनच युजर्स फोन खरेदी करताना मोठी रक्कम देखील खर्च करायला तयार असतात. तुम्हाला मजबूत फीचर्स असलेला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर काही भन्नाट फोन नेहमीपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही हे फोन्स ऑनलाईन खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टफोन्सना जवळपास प्रत्येक किमतीच्या विभागात सूट मिळत आहे. उत्कृष्ट डिझाईन्स, चांगले कॅमेरे आणि शानदार डिस्प्ले असलेले हे स्मार्टफोन्स प्रयेक युजर्सच्या विशलिस्टमध्ये असतील यात दुमत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम अशाच काही ऑफर्सची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुमची मोठी सेव्हिंग होईल. विशेष म्हणजे, लिस्टमध्ये Samsung Galaxy S21 FE 5G,Apple iphone 11 ,Google Pixel 6a, Oppo Reno 8 Pro 5G सारख्या जबरदस्त फोन्सचा समावेश आहे.

iPhone 12 Mini

iphone-12-mini

Apple iPhone 12 Mini: कॉम्पॅक्ट आकाराच्या 5G iPhone मॉडेलची Retail price ६४,९०० रुपये आहे. परंतु, Flipkart वर २४ टक्के सूटसह हा फोन ४८,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. जुने डिव्हाइस एक्सचेंज केल्यास १७,५०० रुपयांपर्यंतची अतिरिक्त बचत केली जाऊ शकते. या डिव्हाइसवर बँक ऑफर्सचा लाभ देखील उपलब्ध आहे.यात ५.४ इंचाचा ओलेड सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन HDR सपोर्ट करतो. हे A14 बायोनिक चिप प्रोसेसर सोबत येते. डिवाइस IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. हे लेटेस्ट iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करते.

वाचा :Phone Charging: स्मार्टफोन चार्ज करताना हे ५ पॉईंट्स ठेवा लक्षात, अँड्रॉइड फोन होईल पटापट चार्ज

​Oppo Reno 8 Pro 5G

oppo-reno-8-pro-5g

Oppo Reno 8 Pro 5G: या Oppo डिव्हाइसवर सुमारे १३ टक्के सूट मिळत आहे आणि त्याचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ४५,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर खरेदी केले जाऊ शकतात. या डिव्हाइसवर १७,५००० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा ऑप्शन दिला आहे. फोनमध्ये Mediatek Dimensity 1300 Processor दिले आहे. सोबत यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर फ्रंट कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे.

वाचा:हिंदीत Tweet करताहेत Elon Musk ? ट्वीटमध्ये शाहरुख खानचा डायलॉग पाहून युजर्स म्हणाले हे काय ?

Google Pixel 6A

google-pixel-6a

Google Pixel 6a: Google च्या स्वस्त पिक्सेल मॉडेलच्या फक्त 6 GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर सुमारे २० टक्के सूट मिळत आहे. या सूटसह Pixel 6a ची किंमत ४३,९९९ रुपयांवरून ३४,९९९ रुपयांवर आली आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला २०,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. Flipkart वर अनेक बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये १२.२ -मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह १२-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. कंपनी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

वाचा : Twitter युजर्स लक्ष द्या,’हे’ काम केल्यास Elon Musk सस्पेंड करणार तुमचे अकाउंट, ब्लू टिकही जाणार

​Apple iPhone 11

apple-iphone-11

Apple iPhone 11 : iPhone 11 चा 128 GB स्टोरेज प्रकार पाच टक्के सवलतीत उपलब्ध आहे आणि तो ४८,९०० रुपयांऐवजी ४५,९९० रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफर्स व्यतिरिक्त या फोनवर १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. आयफोन 11 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. आतापर्यंत वेगवान स्मार्टफोन चीप A14 Bionic सोबत येत आहे. यात १२ मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा, ४के डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग आणि जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी मिळते.

Samsung Galaxy S21 FE 5G

samsung-galaxy-s21-fe-5g

Samsung Galaxy S21 FE 5G: या सॅमसंग फॅन एडिशन स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर पूर्ण ४० टक्के सूट मिळत आहे. ७४,९९९ रुपयांची मूळ किंमत असलेला हा फोन ४४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरसह १७,५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. Galaxy S21 FE 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4 देण्यात आला आहे. याशिवाय, यात ६.४ -इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड 2x डिस्प्ले 5 आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे.

वाचा: शानदार ऑफर ! MRP पेक्षा कमी किमतीत घरी येईल ‘हा’ पॉप्युलर 5G स्मार्टफोन

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here