Airtel 155 Plan

१५५ रुपयांचा प्लान : एअरटेलच्या या प्लानमध्ये २४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंगचा लाभ तुम्हाला घेता येईल. तसेच या प्लानमध्ये एअरटेल युजर्सना ३००० एसएमएस मिळतील. डेटा वापरणाऱ्यांसाठी या प्लानमध्ये १ GB डेटा दिला जात आहे. तसेच, आणि Hello Tunes अतिरिक्त फायदे दिले आहेत. याशिवाय, विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन आहे.
१७९ रुपयांचा प्लान : हा प्लान २४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, ३०० SMS,२GB डेटा आणि Hello Tunes चे अतिरिक्त फायदे देते. याशिवाय विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन आहे.
वाचा : Twitter युजर्स लक्ष द्या,’हे’ काम केल्यास Elon Musk सस्पेंड करणार तुमचे अकाउंट, ब्लू टिकही जाणार
Airtel Plan

२०९ रुपयांचा प्लान: हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० SMS, २१ दिवसांच्या वैधतेसह १ GB दैनिक डेटा आणि Hello Tunes चे अतिरिक्त फायदे आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.
२३९ रुपयांचा प्लान : हा प्लान २०० रुपयांपेक्षा किंचित जास्त महाग आहे. पण, तो २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० SMS, १.५ GB दैनिक डेटा ऑफर करतो. अतिरिक्त लाभ म्हणून, यात विनामूल्य हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचे विनामूल्य सदस्यत्व समाविष्ट आहे.
वाचा: Samsung Galaxy, iPhone आणि Google च्या या स्मार्टफोन्सवर तब्ब्ल ४० टक्क्यांपर्यंत ऑफ, फीचर्स A1
VI Plans Under 200

Vi च्या या प्लान्सची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी :१७९ रुपयांचा प्लान : व्होडाफोन आयडियाचा प्लान अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. तसेच, या जबरदस्त प्लानमध्ये व्होडाफोन आयडिया युजर्सना ३०० SMS मिळतील. २ GB डेटा आणि २८ दिवसांच्या वैधतेसह Vi Movies आणि TV चे अतिरिक्त फायदे देते.
१९५ रुपयांचा व्होडाफोन आयडिया प्लान : व्होडाफोन आयडियाचा हा प्लान देखील अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. तसेच, यात ३०० एसएमएस चा लाभ घेता येईल. प्लान १ महिन्याच्या वैधतेसह २ GB डेटा आणि Vi Movies आणि TV चे अतिरिक्त फायदे देते.
VI vs Airtel

कोणता प्लान आहे सर्वात बेस्ट ? फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel आणि vodafone-idea दोन्ही कंपन्यांचे प्लान्स समान फायद्यांसह येतात. पण, एअरटेलच्या सुरुवातीच्या प्लानची किंमत १५५ रुपये आहे आणि Vi च्या प्लानची किंमत १७९ रुपये आहे. परंतु, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, एअरटेलच्या प्लानमध्ये २४ दिवसांची वैधता देण्यात आली आहे, तर व्होडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तुम्हाला जर अधिक वैधता हवी असेल तर तुम्ही व्होडाफोन आयडियाचा विचार करू शकता.
वाचा: iPhone 13 Pro वर २० हजारांपेक्षा अधिक सूट, फीचर्स जबरदस्त, डिझाईन किलर, पाहा डिटेल्स
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times