नवी दिल्लीः यूके, यूएस आणि कॅनडाच्या सिक्योरिटी एजन्सींजने इशारा दिला आहे. रशियाचे हॅकर्स करोना व्हायरस वॅक्सिन संबंधित माहितीचा रिसर्च डेटा चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. बीबीसी रिपोर्टच्या माहितीनुसार, इंटेलिजन्स सर्विसेज कडून समोर आलेल्या अॅक्टर्स रशियमन इंटेलिजन्स सर्विसेज संबंधित डेटा चोरीसाठी या हॅकर्सचा प्रयत्न आहे.

वाचाः

डेटा हॅकिंग संबंधित रशियाच्या एका विद्यापीठाने जगातील पहिली कोविड १९ वॅक्सिनला ट्रायल पूर्ण केल्यानंतर काही दिवस होत नाही तोच आता ही माहिती चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. यूके नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटर, कॅनडाच्या कम्युनिकेशन सिक्योरिटी इस्टेबलिशमेंट, अमेरिकेच्या एनएसए आणि सायबर सिक्योरिटी इन्फ्रास्टक्चर सिक्योरिटी एजन्सी कडून सांगण्यात आले आहे की, रशियातील हॅकर्स करोना वॅक्सीन संबंधित डेटा चोरण्याच्या प्रयत्नात आहे.

वाचाः

वॅक्सीन फॉर्म्यूलावर नजर
सिक्योरिटी एजन्सीकडून सांगण्यात आले आहे की, हॅकर्स त्या ऑर्गनायझेशनला लक्ष्य करीत आहे.ज्यांनी कोविड १९ वॅक्सीन बनवण्यासाठी काम करीत आहे. या हॅकिंगच्या मदतीने कोविड वॅक्सीन फॉर्म्यूला चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. हॅकर्सकडून करोना व्हायरस वॅक्सिन संबंधित माहिती आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी चोरी करण्यासाठीअॅटक करण्यात आले आहे.

वाचाः

रशियाचा ग्रुप जबाबदार
एजन्सीकडून कोणत्याही हॅकर्सचे नाव शेअर करण्यात आले नाही. परंतु, हा अटॅक APT29 नावाच्या हॅकर ग्रुपने केल्याचे समोर आले आहे. हॅकर्सचा हा ग्रुप ऑर्गनायझेशनचे सर्वर अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करीत होता. हॅकर्स WellMess आणि WellMail मेलवेयरच्या मदतीने सीक्रेट इन्फॉर्मेशन अपलोड आणि डाऊनलोड करीत होते. दरम्यान, रशियाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here