स्मार्टफोन प्रमाणे आता स्मार्ट टीव्हीत सुद्धा एकापेक्षा एक भारी फीचर्स मिळत आहेत. तुम्हाला जर घरात मोठ्या इंचाचा आणि स्वस्त किंमतीत लेटेस्ट फीचर्सची स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या टीव्ही मार्केट खूप वेगाने वाढत आहे. स्मार्ट टीव्हीची किंमत आधीच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या दिवाळी सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट पाहायला मिळाला होता. जर तुम्ही या दिवाळीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकला नसाल तर आता तुम्हाला खरेदी करण्याची वेळ आली आहे. सध्या फ्लिपकार्ट वर ब्रँडेड स्मार्ट टीव्हीवर ७० टक्के पर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये सोनी, एलजी, रियलमी, मोटोरोला सारख्या ब्रँडे स्मार्ट टीव्हीला अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. जाणून घ्या डिस्काउंट सोबत टीव्हीची लिस्ट.

​TCL C715 सीरीज

tcl-c715-

TCL कडून येणाऱ्या C715 सीरीज टीव्हीमध्ये 139cm (55 इंच) QLED अल्ट्रा HD (4K) डिस्प्लेचा सपोर्ट मिळतो. या टीव्ही सोबत व्हाइस कंट्रोल, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट मिळतो. टीव्ही सोबत 30 W चे स्पीकर दिले आहे. या टीव्हीची किंमत १ लाख २९ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये या टीव्हीला ६८ टक्के डिस्काउंट सोबत फक्त ४१ हजार ४८८ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते.

वाचा: Samsung Galaxy, iPhone आणि Google च्या या स्मार्टफोन्सवर तब्ब्ल ४० टक्क्यांपर्यंत ऑफ, फीचर्स A1

​Realme SLED 4K 55

realme-sled-4k-55

रियलमीच्या या टीव्हीला फ्लिपकार्टवरून ४४ टक्के डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. टीव्हीची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या टीव्हीला ३८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. टीव्ही सोबत एक्सचेंज ऑफर अंतर्गत १६ हजार ९९० रुपयाचे अतिरिक्त डिस्काउंट सुद्धा मिळेल. टीव्हीत ५५ इंचाचा सिनेमॅटिक व्ह्यू दिला आहे. हा टीव्ही SLED टेक्नोलॉजी सोबत येतो. SLED 4K स्मार्ट टीव्हीत कलर्ट मिळते. तसेच आय केअर सुद्धा मिळते. realme SLED 4K 55 टीव्हीत २४ वॉटचे क्वॉड स्टिरियो स्पीकर दिले आहे. सोबत डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट दिला आहे.

वाचा: आता iPhone 14 मिळतोय ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, फीचर्स शानदार, पाहा डील

​Xiaomi Smart TV X43

xiaomi-smart-tv-x43

Xiaomi Smart TV X43 ला फ्लिपकार्ट वरून २८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. टीव्हीची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर ३२ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. Xiaomi Smart TV X43 मध्ये ४३ इंचाचा 4K डिस्प्ले आणि बेजल लेस प्रीमियम मेटल डिझाइन मिळते. टीव्हीत डॉल्बी ऑडियो सोबत 30W चा साउंड आउटपूट दिला आहे. शाओमी टीव्हीत यूट्यूब म्यूझिकला तुम्ही थेट म्यूझिक टॅब ने अॅक्सेस करू शकता. टीव्हीत अँड्रॉयड TV 10 आधारित ६४ बिटचा क्वॉडकोर A55 प्रोसेसर दिले आहे.

वाचाः Google Play Store वर हे ४ धोकादायक ॲप्स उपलब्ध, तात्काळ करा डिलीट

​Realme Smart TV X Full HD

realme-smart-tv-x-full-hd

realme Smart TV X Full HD टीव्हीवर ३६ टक्के डिस्काउंट मिळते. टीव्हीची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये या टीव्हीला २२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. रियलमीच्या या टीव्हीत ४३ इंचाची फुल एचडी स्क्रीनचा सपोर्ट मिळतो. रियलमीच्या या टीव्हीत 24W चा डॉल्बी ऑडियो स्टीरियो स्पीकर सपोर्ट मिळतो. टीव्ही सोबत ४०० हून जास्त निट्स ब्राइटनेस दिले आहे. टीव्ही सोबत स्मार्टी रिमोट सोबत अनेक शॉर्टकट कीज सुद्धा दिले आहे.

वाचाः Jio आणि Airtel मध्ये स्पर्धा ! पाहा 1 GB प्लान्समध्ये कोण देतय स्वस्तात अधिक फायदे

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here