Plans: Airtel, reliance Jio आणि Vodafone- Idea सारख्या नामांकित टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार प्लान्स ऑफर करतात. विशेष म्हणजे कंपन्यांकडे कॉलिंग ते डेटा असे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. अशात तुम्ही जर ३० दिवसांची व्हॅलिडिटी देणारा प्लान शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या आदेशानंतर, सर्व दूरसंचार कंपन्यांनी ३० दिवसांच्या वैधतेसह प्री-पेड प्लान्स लाँच केले. आता reliance Jio, Airtel आणि Vodafone-idea ने ३० दिवसांच्या वैधतेसह आणखी काही नवीन प्री-पेड रिचार्ज प्लान जारी केले आहेत. या प्लानमध्ये, तुम्हाला अधिक डेटाचा लाभ देखील मिळतो, ज्याची वैधता अधिक आहे. यापैकी काही प्लान्समध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. जाणून घेऊया Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या ३० दिवसांची व्हॅलिडिटी देणाऱ्या प्लान्सच्या किमती आणि त्यात मिळणाऱ्या बेनेफिट्सबद्दल सविस्तर.

VI Plans

vi-plans

व्होडाफोन आयडियाचे ३० दिवसांचे प्लान्स: VI मध्ये मासिक वैधतेसह दोन प्री-पेड प्लान्स आहेत, ज्यात ३२७ आणि ३७७ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. ३२७ रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना यामध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. या प्लान्समध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल आणि त्याची वैधता ३० दिवसांची आहे. ३३७ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 28 जीबी डेटा मिळेल आणि त्याची वैधता ३१ दिवस आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल.

वाचा : Reliance Jio च्या ‘या’ स्वस्त प्लानमध्ये फ्री Netflix-Amazon Prime, अनलिमिटेड कॉलसह बरंच काही

Jio Benefits

jio-benefits

जीओचा १८१ रुपयांचा प्लान: जिओकडे १८१ रुपयांचा प्लान देखील आहे, जो ३० दिवसांच्या वैधतेमध्ये येतो. हा प्लान वर्क फ्रॉम होम कॅटेगरीमध्ये मिळते. हा प्लान खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना अधिक डेटाची गरज आहे. या प्लानमध्ये तुम्हाला ३० GB डेटा मिळेल आणि दैनंदिन डेटा वापरावर कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एका दिवसात ३० GB डेटा संपवू शकता किंवा तुम्ही दररोज १ GB डेटा समाप्त करू शकता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये कॉलिंग किंवा मेसेजिंग सुविधा मिळणार नाही.

वाचा : OMG ! एखाद्या बिस्किटासारखा तुटला ९० हजारांचा फोन, Video पाहून सर्वांनाच बसला धक्का

Jio Plans

jio-plans

जिओचा ३० दिवसांचा प्लान: तुम्ही जिओचे युजर असाल तर तुमच्यासाठी कंपनीकडे प्रत्येक बजेटमध्ये आणि विविध विभागात प्लान्स उपलब्ध आहेत. ३० दिवसांच्या वैधतेसह जिओ प्लानबद्दल बोलायचे झाल्यास, ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये येणारा जिओचा २९६ रुपयांचा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या प्लानमध्ये तुम्हाला एका महिन्याच्या वैधतेसह २५ GB डेटा मिळतो. तसेच, या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. जिओच्या २९६ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस सुविधाही उपलब्ध आहेत.

Airtel Plans

airtel-plans

एअरटेल ३० दिवसांचे प्लान्स: एअरटेलने नुकताच १९९ रुपयांचा ३० दिवसांचा वैधता प्लान लाँच केला आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर एकूण ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. त्याच वेळी, एअरटेलच्या ३१९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये २ जीबी डेटा, अमर्यादित कॉल आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. प्लानची वैधता ३१ दिवसांची आहे. प्लानमध्ये Apollo 24/7 Circle, Wink Music आणि मोफत HelloTune देखील आहेत. एअरटेलच्या २९६ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २५ जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि ३० दिवसांसाठी अमर्यादित कॉल्सची सुविधाही उपलब्ध आहे.

वाचा :Over Heating मुळे होऊ शकते लॅपटॉपचे मोठे नुकसान, डिव्हाइस कूल ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here