नवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमी आपला नवीन फोन भारतात २० जुलै रोजी लाँच करणार आहे. नवीन स्मार्टफोन () घेऊन येत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. रेडमीचा हा एक मिड रेंज स्मार्टफोन असणार आहे. नोट ९ सीरीजच्या दोन मॉडल रेडमी नोट ९ प्रो आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स याआधीच भारतात लाँच करण्यात आले आहेत. यांच्या लाँचिंगच्या वेळी कंपनीने या फोनची घोषणा केली होती.

वाचाः

Gizmochina च्या रिपोर्टनुसार, भारतात या फोनला ३ जीबी रॅम मध्ये उतरवण्यात येणार नाही. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनची बेस व्हेरियंटची किंमत १९० डॉलर (जवळपास १४ हजार २००) रुपये आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात रेडमी नोट ९ स्मार्टफोनला ६ जीबी रॅम व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

वाचाः

फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा
रेडमी नोट ९ मध्ये ६.५३ इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ आणि स्पलॅश नॅनो कोटिंग देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात डिस्प्लेच्या टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच होल देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः

रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा सेन्सर शिवाय ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलजा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फेस अनलॉक सुद्धा सपोर्ट करणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, NFC, IR ब्लास्टर आणि रियर मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहेत. फोनला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here