Westinghouse स्मार्ट टीव्ही

चार दिवस चालणाऱ्या अमेझॉन टीव्ही सेव्हिंग डेज सेल मध्ये अमेरिकेची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Westinghouse आपल्या नॉन स्मार्ट आणि स्मार्ट टीव्ही मॉडलला स्वस्तात उपलब्ध केले आहे. २४ इंचाच्या नॉन स्मार्ट एलईडी टीव्ही आणि ३२ इंच, ४० इंच, ४३ इंच, ५० इंच, ५५ इंचाच्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्हीला ऑफर्स सोबत खरेदी करू शकता. ग्राहकांना या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर दिले जात आहे.
वाचा: नो वर्क फ्रॉम होम, नो फूड; कर्मचाऱ्यांसाठी एलन मस्क यांचे नवीन नियम
Discount Offers on Smart TV

Pi Series चा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही एचडी रेडी स्क्रीन सोबत येतो. यात ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेज, 3 HDMI कनेक्शन आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहे. या मॉडल मध्ये डिजिटल नॉइज फिल्टर, बॉक्स स्पीकर सोबत २ स्पीकर, सराउंड साउंड आणि ३० वॉटचे स्पीकर मिळतात. या स्मार्ट एचडी रेडी टीव्हीत यूजर्सला Google Play Store सोबत मल्टीपल अॅप्स आणि गेमचे अॅक्सेस मिळते.
वाचाः Twitter Layoff: कर्मचारी कपात सुरुच ! आता Elon Musk ने ५५०० जणांना नोटिस न देता काढले
२४ आणि ३२ इंच स्मार्ट टीव्ही

२४ इंच (WH24PL01) टीव्ही मॉडलला ५ हजार ४९९ रुपयाच्या स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. हा टीव्ही 20W स्पीकर, ऑडियो एक्वलायझर आणि ऑटोमॅटिक व्हॅल्यूम लेवल ऑडियो फीचर सोबत येतो. या टीव्हीत एचडी रिझॉल्यूशन (1366 x 768) डिस्प्ले मिळतो.
३२ इंचाच्या स्क्रीन (WH32PL09) च्या टीव्ही मॉडल ची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीत एलईडी स्क्रीन, एचडी रिझॉल्यूशन, २ HDMI आणि 2 USB पोर्ट दिले आहे. या टीव्ही मॉडलमध्ये 20W साउंड आउटपूट सोबत २ स्पीकर्स, डिजिटल नॉइज फिल्टर, ऑटोमॅटिक व्हॅल्यूम लेवल, ऑडियो इक्वलायझर सारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळतो.
वाचाः भारताच्या Shlok Mukherjee चे Doodle लाखात एक, Doodle ने जिंकले सगळ्यांचे मन
३२ इंच स्मार्ट टीव्ही

अमेझॉन टीव्ही सेविंग डेज सेलमध्ये ३२ इंचाच्या स्क्रीनचे (WH32SP12) एचडी रेडी आणि 40 इंच (WH40SP50) फुलएचडी स्मार्ट अँड्रॉयड टीव्हीला अनुक्रमे ८ हजार ९९९ रुपये आणि १३ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येईल. दोन्ही डिव्हाइसमध्ये अँड्रॉयड ९ ओएस दिले आहे. यात खूपच स्लीम बेजल दिले आहे. या टीव्हीत 24W स्पीकर आउटपुट, HDR, सराउंट साउंड टेक्नोलॉजी, 2 स्पीकर, 1 जीबी रॅम, 8 जीबी स्टोरेज सारखे फीचर्स दिले आहेत.
वाचा: Flipkart वरून ‘हे’ स्मार्टफोन खरेदी केले तर, मिळेल जबरदस्त डिस्काउंट, पाहा लिस्ट, फीचर्स A1
४३ इंच स्मार्ट टीव्ही

४३ इंचाच्या फुल एचडी (WH43SP99) टीव्हीत 30W स्पीकर आउटपूट मिळते. खूपच स्लिम बेजल सोबत येणाऱ्या या टीव्हीची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. हा टीव्ही मॉडल अँड्रॉयड ९ सोबत येतो. यात सराउंड टेक्नोलॉजी, १ जीबी रॅम व ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे.
वाचा: सततच्या वापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते ? खरेदी करा 6000 mAh बॅटरीसह पॅक्ड ‘हे’ स्मार्टफोन्स
४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

४३ इंच (WH43UD10) स्क्रीनच्या अल्ट्राएचडी ४के मॉडलची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. तर ५० इंच (WH50UD82) यूएचडी/4K टीव्हीची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीत २ जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज, 3 HDMI पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. टीव्ही मॉडल HDR 10, क्रोमकास्ट सपोर्ट करते. यात २ स्पीकर, डिजिटल नॉइज फिल्टर, ४० वॉट स्पीकर आउटपूट सपोर्ट करते.
वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत सर्वात जबरदस्त प्लान, रोज मिळेल 4GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग
५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही

५५ इंच स्क्रीनच्या अल्ट्राएचडी (WH55UD45) मॉडलची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे. खूपच स्लीम बेजल सोबत येणारा हा टीव्ही अँड्रॉयड ९ सोबत येतो. या डिव्हाइस मध्ये 40W स्पीकर आउटपूट, HDR10, 2GB रॅम, सराउंड साउंड टेक्नोलॉजी, 8 जीबी स्टोरेज आणि 2 स्पीकर सोबत येतो.
वाचाः Nothing Phone (1) १५ हजारात खरेदी करण्याची शेवटची संधी, फोनचे फीचर्स सुपरहिट
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times