नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असात तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. Flipkart वर Apple Days Sale ला कालपासून म्हणजेच १६ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. हा सेल २० नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये आयफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. यात यूजर्सला आकर्षक डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय सह अनेक दुसरे ऑफर्स सुद्धा मिळत आहेत. iphone 11, iphone 12 mini, iphone 13 , iphone 14 आणि iphone 14 plus या फोनला मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते. तुम्हाला जर आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या फोनवर किती डिस्काउंट आणि कोणती ऑफर्स देत आहे, जाणून घ्या डिटेल्स.

​iPhone 12 Mini

iphone-12-mini

या फोनला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन छोटी आहे. परंतु, एक कॉम्पॅकट फोन चाहत्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. फोनला तुम्ही डिस्काउंट नंतर ३९ हजार ९९९ रुपये किंमतीच्या सुरुवातीत खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची आहे. स्मार्टफोन ए १४ बायोनिक प्रोसेसर सोबत येतो. या फोनमध्ये ५.४ इंचाचा डिस्प्ले, ५जी कनेक्टिविटी आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः जिओने लाँच केले नवीन रिचार्ज प्लान, किंमत आणि बेनिफिट्स जाणून घ्या

​iPhone 11 वर काय आहे ऑफर

iphone-11-

iPhone 11वर आकर्षक ऑफर मिळत आहे. सेलमध्ये या फोनला ४० हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनच्या ६४ जीबी स्टोरेजची ही किंमत आहे. या फोनला ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हा फोन ए १३ बायोनिक चिपसेटवर काम करतो. या फोनमध्ये ६.१ इंचाचा रेटिना एचडी स्क्रीन दिला आहे.

वाचाः Airtel यूजर्स लक्ष द्या, या १३ शहरात 5G सर्विस झाली Live, फ्रीमध्ये चालव अनलिमिटेड इंटरनेट

​iPhone 13 वर मिळतेय ऑफर

iphone-13-

या हँडसेटच्या बेस व्हेरियंट १२८ जीबी स्टोरेज सोबत आणले गेले आहे. या फोनला डिस्काउंट नंतर ६४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोन मध्ये A15 Bionic चिपसेट दिले आहे. फोनमध्ये 6.1-inch चा Super Retina XDR डिस्प्ले मिळतो. यात 12MP + 12MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

वाचाः मोदी सरकारचे ‘एक देश, एक चार्जर’ धोरण, मोबाइल कंपन्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

​iPhone 14 आणि iPhone 14 Plus

iphone-14-iphone-14-plus

या सीरीजवर तुम्हाला ५ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. हा डिस्काउंट एचडीएफसी बँक कार्ड वर मिळतो. या डिस्काउंट नंतर तुम्ही या फोनला ७४ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर प्लस व्हेरियंट म्हणजेच आयफोन १४ प्लसला ८४ हजार ९०० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हा फोन ए १५ बायोनिक प्रोसेसर सोबत येतो. या फोनमध्ये दोन्ही कॅमेरे एकसारखेच आहेत.

वाचाः FIFA World Cup: फुटबॉल चाहत्यांसाठी जिओची भेट, ५ नवीन प्लान्स लाँच

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here