Renuka Deshmukh | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Nov 2022, 1:22 pm

iPhone 12 Price: एका प्राईस ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, १५ नोव्हेंबर रोजी त्याची किंमत ५६,१२९ रुपये होती, जी आज ४८,९९९ रुपये दर्शवित आहे. काही मॉडेल्स एक्स्चेंज करून ग्राहक iPhone 12 ची किंमत १७,५०० रुपयांनी कमी करू शकतात.

 

iPhone 12
नवी दिल्ली:iPhone 12 Offers : आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आयफोन 12 आता भारतात फ्लिपकार्टवर ४८,९९९ रुपयांना उपलब्ध असून ई-कॉमर्स वेबसाइट 64GB iPhone 12 वर ७१३० रुपयांची सूट देत आहे. हा फोन भारतात २०२० मध्ये लाँच करण्यात आला होता. त्या वेळी त्याची किंमत ७९,९९० रुपये होती. याशिवाय फ्लिपकार्ट एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होईल. Flipkart वर त्याची किंमत आणखी कमी करण्यासाठी ग्राहक बँक ऑफर देखील घेऊ शकतात.

वाचा: QR Code स्कॅन करताना राहा अलर्ट, लहान चूक सुद्धा रिकामे करू शकते बँक अकाउंट

तसेच, एक्सचेंजद्वारे काही मॉडेल्स बदलून ग्राहक iPhone 12 ची किंमत १७,५०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. पण, तुम्ही जो फोन एक्स्चेंज करू इच्छिता त्याच्या स्थितीवर एक्स्चेंज व्हॅल्यू अवलंबून असेल. Flipkart फेडरल बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डसह पूर्ण केलेल्या व्यवहारांवर अतिरिक्त १० टक्के सूट देत आहे. ही सूट जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंत असू शकते. ऑफरचा लाभ iPhone 12 वर 128GB आणि 256GB स्टोरेजसह घेऊ शकता. त्यांची किंमत अनुक्रमे ५३९९९ आणि ६१,९९९ रुपये आहे.

वाचा: इतरांपासून लपवून ठेवा फोनमधील महत्वाचे Apps, प्रायव्हसीसाठी फॉलो करा भन्नाट ट्रिक्स

iPhone 12 चे फीचर्स शानदार

iPhone 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि सिरॅमिक शील्ड ग्लाससह ६.१ -इंच OLED डिस्प्ले पॅनेल आहे. हँडसेट A14 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे. हे 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. iPhone 12 दोन १२ MP सेन्सरच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यासोबतच १२-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. धूळ आणि पाणी प्रतिरोधक असण्यासाठी याला IP68 रेटिंग देखील मिळाली आहे.

यासोबत तुम्हाला चार्जिंगसाठी अॅडॉप्टर दिले जात नाही. मात्र, USB-C लाइटनिंग केबल देण्यात आली आहे. Apple चा दावा आहे की, डिव्हाइस पूर्ण चार्ज झाल्यावर १७ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते.

वाचा: फोन हरविल्यास Bank आणि Mobile डिटेल्स ‘असे’ ठेवा सेफ, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here