Reliance Jio 2GB Plans : रिलायन्स जिओच्या युजर्सची संख्या मोठी आहे. अनेक जण जिओची सेवा वापरतात. कंपनी देखील युजरच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊनच प्लान्स सादर करत असतात. महत्वाचे म्हणजे रिलायन्स जिओचे अनेक प्रीपेड प्लान आहेत जे दररोज २ GB डेटा देतात. Jio च्या अशा प्रीपेड पॅकची किंमत २४९ रुपयांपासून सुरू होते आणि २८७९ रुपयांपर्यंत जाते. जर तुमचा डेटा खर्च वाजवी असेल आणि तुम्हाला असा प्लान हवा असेल जो, किफायतशीर असेल आणि दररोज भरपूर डेटा देईल,.तर, Jio चा २ GB डेटा प्लान तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आज आम्ही Reliance Jio च्या अशा सर्व भन्नाट रिचार्ज प्लॅनबद्दल तपशीलवार सांगत आहो, ज्यात दररोज २ GB डेटा मिळतो. तसेच, सोबत इतर फायदेही मिळतात. जाणून घेऊया या प्लान्सबद्दल सविस्तर.

Jio 249 Plan

jio-249-plan

जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लान: रिलायन्स जिओच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता २३ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ GB डेटानुसार एकूण ४६ GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय, कंपनी आपल्या ग्राहकांना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश देखील देते.कमी किमतीत हा एक चांगला प्लान आहे.

वाचा : अवघ्या ३० रुपयांत ६ OTT Platforms चे सबस्क्रिप्शन ऑफर करतेय ‘ही’ कंपनी

Jio 299 Plan

jio-299-plan

२९९ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक : रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटानुसार एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. हा प्लान Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.

वाचा: कमी बजेटमुळे Second Hand Smartphone खरेदी करताय? या गोष्टींकडे द्या लक्ष, नुकसान होणार नाही

Jio 533 Plan

jio-533-plan

५३३ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान : रिलायन्स जिओच्या ५३३ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज २ जीबी डेटासह एकूण ११२ जीबी डेटा देण्यात आला आहे. Reliance Jio च्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या Jio रिचार्जमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्सवर मोफत प्रवेश देखील मिळतो.

वाचा : याला म्हणतात ऑफर ! ६० हजार रुपयांचा iPhone फक्त २६ हजारात होईल तुमचा, पाहा डिटेल्स

Jio 719 Plan

jio-719-plan

७१९ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक: रिलायन्स जिओच्या ७१९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. दररोज २ जीबी डेटानुसार, या प्रीपेड पॅकमध्ये एकूण १६८ जीबी डेटा उपलब्ध आहे. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. प्लानमध्ये ग्राहक अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा लाभ घेऊ शकतात. या प्लानमध्ये दररोज एकूण १०० एसएमएस ऑफर केले जातात. Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये JioTV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले आहे.

Jio 2879 Plan

jio-2879-plan

जिओचा २८७९ रुपयांचा प्रीपेड प्लान: २८७९ रुपयांच्या Jio प्रीपेड पॅकची वैधता ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याचा अर्थ असा की, एकूण ७३० जीबी डेटा ग्राहक वापरु शकतो. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड ६४ Kbps पर्यंत कमी होतो. Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. या रिचार्ज पॅकमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.

वाचा: Smartphone Offers: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? ‘या’ फोनवर मिळतोय ८ हजार रुपयांपेक्षा अधिक डिस्काउंट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here