नवी दिल्लीः मोटोरोलाचा प्रसिद्ध फोन मोटोरोला वन फ्यूजन प्लसचा आज पुन्हा एकदा भारतात सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर फ्लॅश सेलला सुरुवात होणार आहे. फोन 730G प्रोसेसर, 6GB RAM सोबत येतो. भारतात या फोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आधीच्या सेलमध्ये अवघ्या काही मिनिटात हा फोन विकला गेला होता.

वाचाः

५०० रुपयांनी महाग झाला
आता पर्यंतच्या सेलमध्ये हा फओन १६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकत होता. आता कंपनीने स्मार्टफोनची किंमत ५०० रुपयांनी महाग झाली आहे. आता या फोनची नवीन किंमत १७ हजार ४९९ रुपये झाली आहे. हा फोन 6GB + 128GB मध्ये येतो. नवीन किंमत फ्लिपकार्टवर अपडेट करण्यात आली आहे.

वाचाः

चे वैशिष्ट्ये
मोटोरोलाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तो HDR10 सर्टिफिकेशनसोबत येतो. पॉवरफुल परफॉमन्स साठी कंपनीने यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर दिला आहे. याला गेमिंग प्रेमी आणि पॉवर युजर्संसाठी खास डिझाईन केला आहे. तसेच फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने युजर्स १ टीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आणि डेडिकेटेड गुगल असिस्टेंट बटन देण्यात आले आहे.

वाचाः

फोनच्या रियरमध्ये चार कॅमेरे
मोटोच्या या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे दिले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here