शुभम पाटील

भारतात लवकरच ५जीचं वारं वाढणार आहे. जिओ-गुगलच्या ३० हजार कोटींच्या करारामुळे भारतात विकासाला वेग येणार आहे. तसंच ५जी तंत्रज्ञान देणाऱ्या चीनी कंपन्यांना यामुळे नक्कीच धक्का बसणार आहे. २०१९ मध्ये भारतात पहिल्यांदा ५जी टेक्नॉलॉजी लोकांसमोर आणली गेली. काही रिपोर्टसनुसार ५जी तंत्रज्ञान हे ४जीपेक्षा शंभर पट अधिक वेगवान असणार आहे. त्यामुळे भारतातील मोबाइल इंटरनेटचा स्पीड १० गिगाबाइट प्रति सेकंद इतका होऊ शकतो. या स्पीडमुळे हाय-डेफिनेशन मूव्हीज, मोठे सॉफ्टवेअर्स अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात काही मोबाइल कंपन्यांनी लाँच केले आहेत. चला, तर मग या फ्युचर टेक्नॉलॉडी असलेल्या फोनवर एक नजर टाकू या…

वाचाः

वन प्लस ८ प्रो, ५जी

वन प्लस कंपनीतर्फे वन प्लस ८ प्रो ५जी हा ५जी टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करण्यात आला असून यात फ्लुइड अॅमोलेड ३१६८ x १४४०चं सोल्युशन असलेला डिस्प्ले आणि थ्रीडी कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन असणार आहे. यासोबतच फास्ट चार्जिंग, अॅडापटीव्ह डिस्प्ले, मोशन ग्राफीक स्मूथनिंग, रिडींग मोड इ. फीचर्स आहेत. हायडेफिनेशन डिस्प्ले, तगडा रॅम यामुळे गेमर्ससाठी हा फोन उत्तम असणार आहे. या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे असून यातील मुख्य कॅमेरा हा ४८ मेगापिक्सेलचा असणार आहे तर फ्रंट फेसिंग कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा आहे.

वाचाः

शाओमी एम आय १०, ५जी फोन

क्वालकोम स्नॅपड्रॅगन ८६५ या लेटेस्ट आणि ॲडव्हान्स प्रोसेसरवर चालणारा शाओमी एम आय १० फोन ५जी टेक्नॉलॉजी अनेबल्ड आहे. ८ जीबी रॅम १२८ जीबी इंटरनल मेमरीमुळे मोठे ॲप्स सॉफ्टवेअर अगदी स्मूथ चालण्याची क्षमता या मोबाइलमध्ये असणार आहे. या मोबाइलमध्ये ५जी सोबतच वायफाय ६ असल्यानं नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि एकूणच इंटरनेट स्पीड अविश्वसनीय असणार आहे. फोनमध्ये मागील बाजूस मुख्य १०८ मेगापिक्सल कॅमेरा, १३ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स असणार आहे. तसंच २० मेगापिक्सेलचा अल्ट्रा क्लिअर पॅनोरमा सेल्फी कॅमेरा देखील असणार आहे. ६.६७ इंच ऍमोलेड ट्रू कलर डिस्प्ले सोबतच फास्ट चार्जिंगची सोय असलेल्या ४७८० एमएएच क्षमतेच्या बॅटरीमुळे हा नक्कीच एक फीचर पॅक फोन ठरणार आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी एस २०, एस २० प्लस, एस २० अल्ट्रा

मोबाइल क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या सॅमसंगने आपली एस २० सीरिज लाँच केली आहे. ६.२ इंच १४४०x३२०० रिझोल्युशनचा एचडी प्लस डायनामिक ऍमोलेड २ एक्स डिस्प्ले आणि ८ व १२ जीबी रॅमचे ऑप्शन असल्यानं सध्या हा फोन प्रेमियम फोन म्हणून नावारूपास आला आहे. ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सल वाइड अँगल, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल असे तीन कॅमेरे फोनच्या मागील बाजूस असणार आहे तर १० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. यासोबतच दमदार ४००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

वाचाः

रियल मी एक्स ५० प्रो, ५जी

इतर फ्लॅगशिप प्रीमियम फोनप्रमाणे रियल मी एक्स फिफ्टी प्रो ५जी फोनमध्ये मोबाइलच्या मागील बाजूस स्टायलिश लूक देण्यात आला आहे. समोर स्क्रीनवर २ कॅमेरे तर ६.४४ इंचचा एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले या मोबाइलला असल्याने ग्राहकांना उत्तम डिस्प्ले क्वालिटी मिळणार आहे. मोबाइलच्या एकूण डिस्प्लेपैकी ९२ टक्के डिस्प्ले स्क्रीन ही कॉर्निग गोरिला ग्लासने प्रोटेक्टेड असल्यानं त्यावर चरे उठण्याची शक्यता फारच कमी आहे. रियल मीच्या या फोनमध्ये क्वालकोम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर असून १२जीबी रॅम असणार आहे. यासोबतच ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड, १२ मेगापिक्सल टेलीफोटो आणि २ मेगापिक्सेल पोट्रेट लेन्स आहेत. तसंच सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेलचा प्रायमरी तर ८ मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर असणारा कॅमेरा असणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here