Best 5G Phone under 20000 rupees : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी देशात ५जी सर्विस अधिकृतपणे लाँच केली आहे. आता टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल लागोपाठ देशात ५जी नेटवर्क रोलआउट करीत आहे. २५ नोव्हेंबर रोजी रिलायन्स जिओने गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजेच ३३ जिल्ह्यात आपली ५जी सर्विस उपलब्ध केली आहे. याशिवाय, देशातील अनेक शहरात आता ५जी सर्विस उपलब्ध केली जात आहे. तुमच्या शहरात जर ५जी नेटवर्क मिळत असेल आणि तुम्हाला जर ५जी सपोर्ट असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही स्वस्त किंमतीतील स्मार्टफोन्सची लिस्ट, त्याची किंमत आणि फीचर्स संबंधी माहिती देत आहोत. या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये सॅमसंग, शाओमी, पोको, मोटोरोला आणि विवो कंपनीच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या सर्वच्या सर्व फोन संबंधी सर्वकाही जाणून घ्या.

​शाओमी रेडमी नोट ११ टी ५जी

या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. देशातील सर्वात बेस्ट आणि स्वस्त ५जी मोबाइल फोन पैकी एक आहे. शाओमीच्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८१० जी प्रोसेसर दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याची डेनसिटी ३९९ पीपीआय आहे. शाओमीचा हा फोन ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सोबत येतो. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे.

वाचाः अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार

​Samsung Galaxy F23 5G

samsung-galaxy-f23-5g

सॅमसंगच्या या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये ६.६ इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे. याचा पिक्सल डेनिसिटी ४०० पीपीआय आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. सॅमसंगचा हा फोन ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 25W चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः ५ डिसेंबरला निवडणूक, त्याआधीच 5G नेटवर्क मिळवणारे गुजरात बनले देशातील पहिले राज्य

​Motorola Moto G51 5G

motorola-moto-g51-5g

Motorola Moto G51 5G स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवले जावू शकते. फोनमध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्रो प्रोसेसर दिले आहे.

वाचाः मस्तच! आता स्वतःच्या आवाजात लावा Whatsapp Status; येतेय मजेदार फीचर

​Poco M4 Pro 5G

poco-m4-pro-5g

Poco M4 Pro 5G मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनचे स्टोरेज १ टीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसेर सोबत येतो.

वाचाः DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

​Vivo T1 5G

vivo-t1-5g

विवोच्या Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिले आहे.

वाचाः Twitter Blue: २ डिसेंबर रोजी री-लाँच होणार सर्विस, आता तीन वेगवेगळ्या रंगात मिळेल टिक मार्क

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here