नवी दिल्लीः भारत-चीन या दोन देशातील संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडले आहेत. भारत सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने थयथयाट केला. भारतासह अनेक देशाने चीन विरोधी भूमिका घेतली आहे. या यादीत आता ब्रिटन सुद्धा आले आहे. ब्रिटनच्या सरकारने डेव्हलप करण्यासाठी जपानकडे मदत मागितली आहे. याआधी ब्रिटनमध्ये हुवावे 5G नेटवर्क डेव्हलप करणार होती. ब्रिटनने काही दिवसाआधी वर बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवासांपासून टेक्नोलॉजी आणि सिक्योरिटीवरून तणाव आहे.

वाचाः

ब्रिटनच्या 5G नेटवर्क वरून हटवणार हुवावेचे उपकरण
ब्रिटनने चीनच्या हुवावेपासून वेगळे होताना २०१७ पर्यंत आपले ५जी नेटवर्क वरून हुवावेचे उपकरण हटवण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनने काही दिवसांपूर्वीच युरोपियन युनियन मधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचाः

अमेरिकेत हुवावेला बंदी
चीनच्या हुवावेवर अमेरिकेत बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. हुवावेवर बंदी घातल्यानंतर कंपनी गुगल सर्विसचा वापर करू शकत नाही.

वाचाः

भारतात सुद्धा चीनी अॅप्सवर बंदी
याआधी भारतात ५९ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. या अॅपमध्ये प्रसिद्ध टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉक शिवाय यूसी ब्राऊजर, हेलो, विगो, शेयर इट यासारख्या अॅपचा समावेश आहे.

म्हणून 5G नेटवर्क खास आहे
5G युजर्संना ४ जी नेटवर्कपासून २० पट जास्त स्पीड मिळणार आहे. या स्पीडचा अंदाज यावरून बांधता येवू शकतो. की, एक पूर्ण एचडी फिल्म केवळ एका सेकंदात डाऊनलोड करता येवू शकते. ५ जी युजर्सला गर्दीतही आपल्या मोबाइल प्रोव्हाईडर पासून कनेक्ट होण्यास ३ जी आणि ४ जीबी नेटवर्क्सच्या तुलनेत कोणतीही अडचण नाही. एक पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटपर्यंत डेटाचा एक पॅकेट पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो त्याला लेटेंसी म्हणतात. ५जी प्रकरणात लेटेंसी रेट १ मिलिसेकंद असेल तर ४ जी नेटवर्कमध्ये हा रेट १० मिलिसेकंद असते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here