Budget Phone : आजकाल अनेक जण स्मार्टफोनवर खुप खर्च करण्यापेक्षा बजेट फोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मुख्य म्हणजे या फोनचे फीचर्सही जबरदस्त असतात . तुम्ही सुद्धा १० हजार ते १५ हजार रुपयांचा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. फ्लिपकार्टवर ‘Black Friday सेल’ सुरू आहे, ज्यामध्ये स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही OPPO F19, REDMI 10 Prime, MOTOROLA G52 आणि Micromax IN Note 2 सारखे जबरदस्त फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये, स्टँडर्ड डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला फोन खरेदीवर बँक ऑफरचा लाभ देखील मिळेल. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फ्लिपकार्टचा हा सेल ३० नोव्हेंबरला संपणार आहे. चला जाणून घेऊया अशाच काही निवडक स्मार्टफोन्सबद्दल ज्यामध्ये प्रचंड सूट मिळत आहे.

Micromax In Note 2

micromax-in-note-2

Micromax फोनवर ४५०० रुपये वाचवा: तुम्ही Micromax IN Note 2, 4GB RAM आणि 64GB इंटर्नल स्टोरेज स्वस्तात खरेदी करू शकता, जो सध्या २५ % च्या सूटसह उपलब्ध आहे. Micromax IN Note 2 फोनची मूळ किंमत सध्या १७,९९९ रुपये आहे. पण, तुम्ही तो १३,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर देखील, मानक सूट व्यतिरिक्त, तुम्ही Citi क्रेडिट कार्ड पेमेंटवर अतिरिक्त १० % आणि Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर अतिरिक्त १२ % बचत करू शकता.

वाचा : DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

Oppo F19

oppo-f19

Oppo चा फोन २८ % च्या सवलतीत उपलब्ध आहे: हा फोन OPPO F19 आहे, जो तुम्ही ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये २८ % च्या डिस्काउंटसह १४,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या OPPO F19 फोनची मूळ किंमत २०,९९० रुपये आहे. या फोनमध्ये देखील, मानक सूट व्यतिरिक्त, तुम्ही Citi क्रेडिट कार्ड पेमेंटवर अतिरिक्त १० % आणि Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर अतिरिक्त १२ % बचत करू शकता. ओप्पोचे फोन आवडत असतील हा एक चांगला पर्याय आहे.

वाचा : येत्या काळात २ Sim Card वापरण्याचा ट्रेंड संपणार ? प्लान्सची किंमत वाढ असू शकते कारण

Redmi 10 Prime

redmi-10-prime

या Redmi फोनवर ४००० रुपयांची बचत: तुम्ही आता ४००० रुपये कमी देऊन REDMI 10 Prime तुमच्या घरी आणू शकता. या Redmi फोनवर सध्या २३ % ची सूट मिळत आहे. REDMI 10 Prime ची मूळ किंमत 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज १६,९९९ रुपये आहे. Citi क्रेडिट कार्डसह पेमेंट केल्यास, तुम्हाला १० % ची सवलत मिळेल. म्हणजेच १५०० रुपयांचा ऑफ. तर, दुसरीकडे, तुम्ही Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर १२ % सूट मिळेल. म्हणजेच २००० रुपये वाचवू शकता.

Moto G52

moto-g52

MOTOROLA G52 ३० % च्या बंपर सवलतीसह उपलब्ध : मोटोरोलाच्या या फोनची मूळ किंमत १९,९९० रुपये आहे. फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये, तुम्ही ३० % च्या बंपर डिस्काउंटसह १३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. MOTOROLA G52 फोनसाठी 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज Citi क्रेडिट कार्डसह पेमेंट केल्यास, तुम्हाला १० % ची सवलत मिळेल म्हणजेच १५०० रुपयांची . तर, दुसरीकडे, तुम्ही Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर १२ % म्हणजेच २,००० रुपयांची बचत करू शकता.

वाचा: Black Friday सेलमध्ये या भन्नाट स्मार्टफोनची किंमत झाली ११,००० रुपयांपेक्षा कमी, फोनचे फीचर्स लय भारी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here