नवी दिल्लीः दररोज २ जीबी डेटा आणि देणाऱ्या प्लानविषयी खास माहिती आज तुम्हाला देत आहोत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन – आयडियाचे तुम्ही जर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे प्लान बेस्ट आहेत. या प्लानची वैधता २८ दिवस ते ८४ दिवसांची असून यात २ जीबी डेली डेटा मिळतो.

वाचाः

जिओचा २ जीबी डेली डेटा प्लान
रिलायन्स जिओ कमी किंमतीत २ जीबी डेली डेटा ऑफर करते. नॉन जिओ नेटवर्क्सवर कॉलिंग करण्याची सुविधा आहे. २८ दिवस आणि ८४ दिवसांची वैधता असलेल्या जिओचे हे प्लान २४९ रुपये आणि ५९९ रुपये आहे. यात रोज २ जीबी डेटा ऑफर केली जाते. तसेच यात रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा मिळतात. जिओ ते जिओवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग शिवाय अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी अनुक्रम १ हजार ते ३ हजार मिनिट मिळतात. या प्लानमध्ये जिओ प्लॅटफॉर्म आणि अॅप्सच्या सर्विस ऑफर करतात.

वाचाः

एअरटेलचा २ जीबी डेली डेटा प्लान
रोज २ जीबी डेटाचे दोन प्लान एअरटेल ऑफर करते. पहिला २९८ रुपयांचा प्लान आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. तर दुसरा प्लान हा ६९८ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटासह सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर आहे. एअरटेल थँक्स अॅपसोबत युजर्सला २ जीबी फ्री क्लाउड स्टोरेज सुद्धा मिळतो. प्लानच्या बाकी बेनिफिट्स मध्ये एयरटेल Xstream Premium आणि Wynk Music सब्सक्रिप्शन, Hellotunes आणि FASTag खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

वाचाः

व्होडाफोन-आयडियाचा २ जीबी डेली डेटा प्लान
व्होडाफोन आणि आयडिया च्या ग्राहकांना कंपनी डबल डेटा बेनिफिट्स देत आहे. कंपनीच्या २९९ रुपयांच्या आणि ६९९ रुपयांच्या प्लानची वैधता अनुक्रमे २८ दिवस आणि ८४ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा शिवाय २ जीबी अतिरिक्त डेटा लिमिटेड टाईम ऑफर अंतर्गत मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये रोज एकूण ४ जीबी डेटा दिला जातो. सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत यात रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा दिले जातात. हे प्लान व्होडाफोन-आयडिया व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स आणि झी५ चे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here