मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातात पाच विद्यार्थी आणि एसटी बसचा चालक गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या महामार्गावर लगत असलेल्या खिंडीत पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय सहल अलिबाग, महाबळेश्वर या ठिकाणाहून घरी परतत असताना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव येथे हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली एसटी बसनं रस्त्यात बंद पडलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जाऊन पाठीमागून धडक दिली.

या घटनेत १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महामार्गालगतच्या पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सहल होती. बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच आज सहलीचा शेवटचा दिवस होता आणि सर्व विद्यार्थी गाढ झोपेत असताना अचानक अपघात झाला. हे सर्व विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील बी.जे. खताळ विद्यालयातील आहेत.

14 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here