नवीन वर्ष २०२० सुरू होणार आणि जुने वर्ष संपणार. अर्थातच बहुतेक मंडळी संकल्प ठेवणार (नेहमीप्रमाणे). वर्ष जरी नवीन असले तरी आपण त्यापलीकडे जाऊन मूळ प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. आपल्या जीवनदृष्टीचे काय? तुम्ही स्पष्ट बघू शकता की तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात? आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातील सांसारिक क्रियांमध्ये इतके अडकतो की कोणत्या मार्गाने चाललो आहोत हे आपल्याला दिसत नाही. आपण अंध होऊन जातो. आपण कुठे जात आहोत हे माहीत नसल्यास आयुष्याचा प्रवास करण्याचा अर्थ फारसा उरत नाही. म्हणूनच ते दैनंदिन जीवनामध्ये (प्रतिबिंबित) होण्याची गरज असते.थोडे थांबून त्रयस्थ म्हणून स्वत:ला प्रश्न विचारायला पाहिजे. यामुळे जागृती होण्यास मदत होते. मी कुठे मार्गक्रमण करतो आहे? मागील वर्षी ठरवलेल्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आहेत का? मी जे काम केले ते बरोबर होते? मी कुठे चुकलो? या वर्षी वेगळ्या प्रकारे काम करण्याची आवश्यकता आहे का, असे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारायला पाहिजेत. ज्या व्यक्तीस परिवर्तनाची इच्छा असते, तिने वरील प्रश्नांबद्दल जागरूक असणे आवश्यक ठरते. मगच गाडी रुळावर यायला सुरुवात होऊ शकेल.

बरेचदा आपण केलेला संकल्प अनेक प्रलोभनांमुळे व इच्छाशक्तीअभावी तोडतो. क्वचितच ते पूर्ण करतो. म्हणून प्रथम संकल्प नेहमी वास्तविक असायला पाहिजेत जेणेकरून ते आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद ठेवतात. संकल्प हे आपण स्वत:ला दिलेले वचन असते. आपण स्वत:ला दिलेले वचन पाळू शकत नसू तर दुसऱ्याला दिलेले कसे पाळणार? वचन पाळण्याची सवय कशी लागणार? जेव्हा आपण वचनास जागतो, तेव्हा तीन फायदे होतात – १. आपण सिद्ध करतो की आपणात बदलण्याची शक्ती आहे. २. आपण स्वत:वर अवलंबून राहू शकतो आणि ३. ठरविल्यास स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

165 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here