अकोला : केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेनुसार मातीच्या विटांची निर्मिती बंद करण्याला आता केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. तरीही कोणत्याच विभागाकडून या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाहीला सुरुवात झालेली नाही. औष्णिक वीज केंद्रातील ‘फ्लाय अ‍ॅश’पासून विटा, ब्लॉक, टाइलची निर्मिती बंधनकारक केली आहे. सोबतच इतर अनेक उत्पादनांमध्येही फ्लाय अ‍ॅशचा वापर करण्याची टक्केवारीही ठरवून देण्यात आली आहे.
केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार सप्टेंबर १९९९ मध्ये लाल विटांच्या निर्मितीसाठी भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती.

बांधकामाच्या साहित्यातही ‘फ्लाय अ‍ॅश’चा वापर
त्यानुसार फ्लाय अ‍ॅश, चुना, जिप्सम, वाळू, डस्ट यापासून बनविल्या जाणाऱ्या फ्लाय अ‍ॅशच्या विटा, ब्लॉक, टाइलमध्ये ५० टक्के फ्लाय अ‍ॅश वापरली जाणार आहे, तर पेव्हिंग ब्लॉक, पेव्हिंग टाइल, मोजाइक टाइल, रुफिंग शिट, प्रिकास्ट एलिमेंट या घटकांमध्ये फ्लाय अ‍ॅशचा वापर १५ टक्के, तर सिमेंटमध्येही १५ टक्के वापर करावा लागणार आहे.

21 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here