बीड : जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष – उपाध्यक्षांच्या निवडी 4 जानेवारीला होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच अपात्र ठरविलेल्या त्या पाच सदस्यांच्या मतांच्या अधिकाराबाबत 2 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या निर्णयावरही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण ठरणार आहे. पूर्वी ही सुनावणी 16 जानेवारीला होणार होती; परंतु अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक अगोदर होणार असल्याने आता सुनावणी आज होत आहे.

जिल्हा परिषदेत सध्या 53 सदस्य असून सत्ता भाजपची आहे. पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या.

याविरोधात या सदस्यांनी तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अर्धन्यायिक न्यायालयात धाव घेतली. पंकजा मुंडे यांनी यातील अश्विनी निंबाळ (आष्टा, ता. आष्टी) यांना सदस्यत्व बहाल केले, तर मंगल डोईफोडे (पिंपळनेर, ता. बीड), प्रकाश कवठेकर (डोंगरकिन्ही), अश्विनी जरांगे (अंमळनेर, ता. पाटोदा) व शिवाजी पवार (पाडळी, ता. शिरूर कासार) आणि संगीता महारनोर (धानोरा, ता. आष्टी) यांना अपात्र ठरविले.

दरम्यान, याविरोधात या पाच सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. न्यायालयाने अपात्रतेचा निर्णयाला स्थगिती दिली परंतु मतांचा अधिकार मात्र नाकारला. अध्यक्ष – उपाध्यक्षांच्या निवडी असल्याने मतांचा अधिकार देण्याची विनंती वरील सदस्यांनी केली होती. त्यावर खंडपीठाने ता. 16 डिसेंबर ही सुनावणीची तारीख देत या निर्णयाच्या अधीन राहून निवडी कराव्यात’ असे निर्देश दिले होते. परंतु पुनर्विचार अर्जानंतर आता यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here